वार्ताहर / कामुर्ली
कोलवाळ राममंदिरात राम जन्मोत्सव वर्षानुवर्षे मोठय़ा प्रमाणात भक्तीभावाने असंख्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. पण यंदा कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीने सरकारचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.
देवळात काही ठराविक लोक ठराविक अंतरावर बसून र्कीतन ऐकत होते. बाकीच्यांना देवळात प्रवेश देण्यात येत नव्हता. रामजन्म सोहळा झाल्यावर प्रथम देवळात असलेल्या सर्वांना रामदर्शन देण्यात आले. देवळाच्या गेटी खुल्या करून एकेकटय़ाला रामदर्शन घेण्यासाठी आत सोडण्यात येत होते. रामदर्शन झाल्यावर बाहेर जाण्यासाठी गेटवर सुंठ वाटण्यात आली. रामदर्शन सर्वांना मिळावे म्हणून राममंदिर समितीचे सर्व पदाधिकारी सरकारचे सर्व नियम पाळून व्यवस्थित कार्यरत होती.
यावेळी रामदर्शन सोहळय़ात मोठी गर्दी नव्हती. देवळात व देवळाबाहेरील सर्व भाविकांनी मास्क परिधान केले होते. रस्त्याच्या कडेला मोजकीच खाज्याची दुकाने होती. एकूण कोलवाळ राममंदिरात रामजन्म सोहळा व्यवस्थित शिस्तब्ध पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.