वार्ताहर /कामुर्ली
कोलवाळ राममंदिर येथे रामजन्म सोहळा मोठय़ा उत्साहाने व भक्ती भावाने साजरा करण्यात आला. मंदिर समितीने सर्वांना रामजन्म दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी महिला व पुरुषासाठी दोन रांगा लावल्या होत्या. या रामजन्म सोहळय़ाला कोलवाळ, रेवोडा, नादोडा, पीर्ण, कामुर्ली, पेडण्यातील धारगळ व जवळ पासचे बहुतेक भाविकांनी दर्शन घेतले. समिती तफे? देवळाची सजावट सू?दर प्रमाणे केली होती तसेच दिव्यांच्या झगमटही चांगल्या प्रकारे केलेला पहायला मिळाला. एकूणच यंदा रामजन्म सोहळा कोलवाळ राममंदिर येथे मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.