प्रतिनिधी /मडगाव
कोलवा येथील अनिलकुमार बांदोडकर यांच्या कारची हानी केल्याच्या आरोपावरुन कोलवा पोलिसांनी सुरावली -कोलवा येथील सातुर्निनो रोड्रिग्स या संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 3 एप्रिल 2022 रोजी दुपारच्यावेळी घडली. पेड सुरावली येथील पेट्रोल पंप समोरील जागेत तक्रारदार बांदोडकर यांचे बांधकाम चालू होते. संशयित आरोपीने या जागेत बेकायदेशीररित्या प्रवेश केला आणि तकारदाराला तसेच तक्रारदाराचे कंत्राटदार टिटो मास्कारेन्हास व त्यांचे कामगार पवन याना धमकी दिली, शिव्या दिल्या आणि तक्रारदार बांदोडकर यांच्या कारची मोडतोड केली.
या प्रकरणी कोलवा पोलिसांनी वरील संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 447, 504, 506 व 427 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयदीप आम्रे तपास करीत आहेत.