प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी पेठेतील, श्री. खंडोबा तालीम मंडळाची बुधवारी वार्षिक सभा झाली. यावेळी 2021-22 साठी मंडळाच्या अध्यक्षपदी सुरेश पोवार यांची तर स्वप्नील पाटोळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. याचबरोबर सौरभ चौगले (सेक्रेटरी), शुभम पोवार ( सह. सेक्रेटरी) व स्वप्नील वणीरे ( खजानीस) म्हणून निवड झाली. माजी अध्यक्ष विश्वास पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी पंडित पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, नंदकुमार करवते, प्रल्हाद पोवार, सुरेश वणीरे, सुरेश जरग, अनिल करवते, सचिन पोवार, अजित हारुगले, महेश निकम, शिवाजी सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, शेखर पोवार उपस्थित होते.