गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
प्रतिनिधी / मुंबई, कोल्हापूर
कोल्हापुरातील गुन्हय़ाशी निगडित पुराव्यांच्या तपासणीसाठी यापूर्वी पुणे येथील फॉरेन्सिक लॅबला जावे लागत होते. कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब आहे पण तेथे आजपर्यंत डीएनए तपासणीची सुविधा नव्हती. याचा विचार करुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोल्हापूर आणि नांदेड येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये डीएनए विभाग कार्यान्वित करण्यासाठी 11.23 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच कोल्हापुरातील फॉरेन्सिक लॅब डीएनए विभागामुळे अत्याधुनिक होणार आहे.
राज्यातील कोल्हापूर आणि नांदेड येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत येत्या दोन महिन्यात डीएनए विभाग कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी अधिवेशनात दिली. निर्भया निधी योजनेंतर्गत पेंद्राकडून राज्याला गेल्या आर्थिक वर्षात 26.85 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून राज्यातील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांचा डीएनए विभाग अधिक सक्षम करण्यात येणार आहे. पेंद्राच्या निर्भया निधी योजनेंतर्गत राज्यातील न्याय सहायक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आठ विभागीय आणि पाच लघु प्रयोगशाळा कार्यरत आहेत. यातील सहाच प्रयोगशाळांमध्ये डीएनए विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि नांदेड येथील न्याय सहायक प्रयोगशाळा, फॉरेन्सिक लॅब अत्याधुनिक करण्यासाठी तेथे डीएनए तपासणी विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मुंबई, नागपूर व पुणे येथील प्रयोगशाळांमध्ये महिला, बालकांवरील अत्याचार प्रकरणांच्या डीएनए विश्लेषणाकरिता स्वतंत्र डीएनए विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी उर्वरित 15.59 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. हे विभाग 2 महिन्यात कार्यान्वित होतील, असे देशमुख यांनी सांगितले.
कोल्हापुरात ताराराणी चौकातील जीवन प्राधिकरणाच्या इमारतीसमोरच्या इमारतीत फॉरेन्सिक लॅबचे कार्यालय आहे. तेथे दोन अधिकारी आणि 10 कर्मचारी आहेत. येथे संगणकीय यंत्रणाही आहे. पण महत्त्वाच्या गुन्हय़ाशी निगडित तपासासाठी घेण्यात येणारे पुरावे, रक्त, संशयिताचे ठसे, केस, गुन्हय़ात वापरलेल्या हत्यारावरील पुरावे आदी नमुने तपासणीची सुविधा येथे नव्हती. त्यासाठी हे नमुने पुणे येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवले जात होते. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोल्हापुरातील फॉरेन्सिक लॅबमध्ये अत्याधुनिक डीएनए तपासणी विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वाअकरा कोटींचा निधी दिल्याचे स्पष्ट केले. या निधीतून कोल्हापुरातील फॉरेन्सिक लॅबमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने डीएनए तपासणी होणार आहे. दोन महिन्यात हा विभाग कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पुण्यातून तपासणी अहवालाची प्रतीक्षा आता कमी होणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.