प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए, संगणक गुन्हे आणि ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण विभाग सुरू झाला आहे.हा विभाग आपल्या कार्यक्षमतेद्वारे राज्यात अव्वल ठरावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
येथील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीमध्ये सायबर तसेच ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण विभागाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील् यांच्या हस्ते झाले. यावेळी ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अधिक्षक अभियंता व्ही. एल. कुलकर्णी, सहायक संचालक दीपक जोशी, श्रीकांत लादे, कार्यकारी अभियंता सोनवणे उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सायबर गुन्हे वाढले आहेत. या लॅबमुळे त्याची उकल होण्यास मदत होणार आहे. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मधील संगणकीय गुन्हे कमी होण्यास मदत होईल. पीडिताच्या न्यायदान प्रक्रियेत लॅबचे महत्वाचे योगदान ठरते, त्यासाठी सँपल कलेक्शन महत्वाचे असते, यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयाने त्याचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करावी. सध्या ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात बॅंकांना निर्देश देण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करावे. कसबा बावडा येथील बझार लाईनमध्ये ज्या 240 क्वार्टरची उभारणी प्रस्तावित आहे. त्यातील काही क्वॉर्टर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीसाठी राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाईल. येथे लॅबशी संबंधित व्यक्ती वगळता इतरांना प्रवेशाबाबत मनाई करावा,r अशी सूचना त्यांनी केली.
न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक संदिप बिश्नोई यांनी राज्यातील सर्व लॅब देशात सर्वोत्कृष्ट असल्याचें सांगितले. सध्या राज्यात 8 डीएनए व इतर 5 मिनी लॅब कार्यरत आहेत. कोल्हापुरात सुरु झालेल्या या लॅबमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली जिह्यांतील सायबर व इतर गुन्हेगारीला आळा घालण्यासंदर्भात प्रयोगशाळा सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास प्रयोगशाळेचे संचालक के. व्ही. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. उपसंचालक रा. ना. कुंभार यांनी आभार मानले.