प्रतिनिधी / कळंबा
कळंबा तलावात एका पुरुषाचा मृतदेह आढळला. नितीन कुंडलिक पाटील वय 38 (रा. गजानन महाराज नगर कोल्हापूर) या पुराषाचा मृतदेह पाण्यात तरंगत असलेला पोलिसांना आढळून आला या व्यक्तीने अंगावरील कपड्या सहित तलावात उडी टाकून आत्महत्या केली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली. यादरम्यान तलाव काठवरती मृताचे पाकीट व चप्पल पोलिसांना आढळून आले आहे.
त्यामध्ये पाकिटामध्ये बँकेचे एटीएम आढळून आले आहे. त्यावरून पोलिसांनी त्या मृत व्यक्तीचे ओळख पटली असून संबंधित व्यक्ती गजानन महाराज नगर या परिसरातील असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली एक तासानंतर मृतदेह बाहेर काढून डेड बॉडी शविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात कडे पाठवून दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.