ऑनलाईन टीम
कोल्हापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. शहरातील सीपीआर रुग्णालय कोरोना केअर सेंटर म्हणून काम करत आहे. आज रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रशासनाकडून रुग्णाचा शोध सुरू आहे.
सीपीआरमधील अस्थिरोग विभागातील कोरोना वॉर्डमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पलायन केले. आज दुपारच्या सुमारास हा प्रकार पुढे आला. त्यानंतर सीपीआर प्रशासनात खळबळ उडाली असून रुग्णाचा शोध सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असणरी कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ सुरूच आहे. गुरुवारी कोल्हापुरात कोरोनाने 12 जणांचा बळी घेतला तर जिल्ह्यात तब्बल 428 नवे रुग्ण आढळले आहेत.