कोल्हापूर/प्रतिनिधी
मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर मधील 23 वर्षांच्या तरुणीला, शाहुवाडीतील 22 वर्षांच्या तरुणाला, आजरा मधील 49 वर्षांच्या पुरुषाला तर भुदरगड मधील 32 वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण 13 आणि 15 मे रोजी सीपीआर मध्ये दाखल झाले होते. आज सकाळी त्यांचे रिपार्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवार दि. १६ रोजी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. हे सर्वजण मुंबई, सोलापूरहून आले होते. आज पुन्हा नव्याने चार कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील रुग्णांची संख्या 41 वर गेली आहे.