कोल्हापूर / प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी राज्यभर एसटी कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानक आवारामध्येही आंदोलन तीव्र होत असताना सरकार कोणतीही दखल घेत नसल्याने नैराश्य आलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकमध्ये डेपोमध्ये गगनबावडा आगारातील कर्मचारी सदानंद सखाराम कांबळे या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून इतर कर्मचाऱ्यांनी कांबळे यांना वाचवले. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकारामुळे एसटी विभागात संताप व्यक्त होताना दिसत आहे.