सक्रीय रूग्णसंख्या 5 हजारांवर, दिवसभरात 345 कोरोनामुक्त, 2 हजार 572 जणांची तपासणी, 1 हजार 637 जणांची अँटीजेन,
केअर सेंटर, हेल्थ सेंटर कार्यान्वित हातकणंगलेमध्ये 147 नवे रूग्ण, नगरपालिका क्षेत्रात 210 रूग्णजिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 22 जणांचा मृत्यू झाला तर 817 नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे सक्रीय रूग्णसंख्या 5 हजार 5 झाली. दिवसभरात 345 जण कोरोनामुक्त झाले. सीपीआर हॉस्पिटल, महापालिका, तसेच तालुका स्तरावर कोरोना माहितीसाठी वॉर रूम बनवल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम ही त्यातील प्रमुख आहे. जिल्ह्यात हेल्थ केअर, केअर सेंटर कार्यान्वित झाली आहेत.
जिल्ह्यात बुधवारी 22 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 961 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 947, नगरपालिका क्षेत्रात 370, शहरात 439 तर अन्य 205 जण आहेत. बुधवारी 2 हजार 572 जणांची तपासणी केली. त्यातील 1637 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. सक्रीय रूग्णसंख्या 5 हजार 5 झाली आहे. दिवसभरात 345 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 52 हजार 434 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 817 नवे रूग्ण समोर आले. यामध्ये आजरा 24, भुदरगड 26, चंदगड 1, गडहिंग्लज 22, गगनबावडा 19, हातकणंगले 147, कागल 17, करवीर 59, पन्हाळा 13, राधानगरी 4, शाहूवाडी 31, शिरोळ 54, नगरपालिका क्षेत्रात 210 कोल्हापुरात 156 तर अन्य 34 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्ण एकूण संख्या 59 हजार 400 झाली आहे.
ग्रामीण भागात पावणेदोन हजार जण होम कोरोंटाईन
शहरात 775 तर ग्रामीण भागात 1 हजार 773 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून 2 हजार 120 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 799 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 1 हजार 411 अहवाल आले. त्यातील 1 हजार 30 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 441 रिपोर्ट आले. त्यातील 279निगेटिव्ह आहेत.
कोरोनाने बुधवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील नावली येथील 89 वर्षीय पुरूष, करवीर तालुक्यातील कळंबा येथील 65 वर्षीय पुरूष, कसबा बावडा येथील 54 वर्षीय महिला, सदर बाजार येथील 59 वर्षीय पुरूष, करवीर तालुक्यातील कळंबा येथील 58 वर्षीय पुरूष, हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील 49 वर्षीय पुरूष, अािण बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये माळ भाग गणेशनगर येथील 49 वर्षीय महिला, आंबेडकर नगर येथील 80 वर्षीय पुरूष, जी. के. नगर येथील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात आजरा तालुक्यातील लाटगाव येथील 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये फुलेवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, मंगळवार पेठेतील 41 वर्षीय महिला, संभाजीनगर येथील 74 वर्षीय पुरूष, घनसवळी ठाणे येथील 35 वर्षीय पुरूष, आसरानगर इचलकरंजी येथील 70 वर्षीय महिला, साने गुरूजी वसाहतीतील 66 वर्षीय पुरूष, रत्नागिरी जिल्ह्Îातील गव्हाणवाडी येथील 58 वर्षीय पुरूष, फुलेवाडी नर्मदा पार्क येथील 35 वर्षीय महिला, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील 53 वर्षीय पुरूष, धोपेश्वर धनगरवाडा येथील 65 वर्षीय पुरूष आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप येथील 72 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
कोरोना रूग्ण 817 ः एकूण ः 59400
कोरोनामुक्त 345 ः एकूण ः 52434
कोरोना मृत्यू 22 ः एकूण मृत्यू ः 1961
सक्रीय रूग्ण ः 5005