प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज कोरोनाने जिल्ह्यात १० जणांचा बळी घेतला. तर ४५२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार पार गेली आहे. आज दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ३१० जणांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र, अनेक लसीकरण केंद्रांवर लसींची कमतरता आहे. तसेच जिल्ह्यात रेमडेसिवीरचाही तुटवडा असून आज कंट्रोल रुमसमोर वादावादीचा प्रकार झाला.