प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हÎात मंगळवारी कोरोनाने 22 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हÎातील 17 जण आहेत. दिवसभरात 832 नवे रूग्ण दिसून आले. सक्रीय रूग्णसंख्या 4 हजार 555 झाली. दिवसभरात 289 जण कोरोनामुक्त झाले. कोरोना मृत्यूसंख्या घटली असली तरी पॉझिटिव्ह रूग्णांत झालेली वाढ संसर्ग वाढत असल्याचे दर्शवत आहे.
जिल्हÎात गेल्या 24 तासांत 22 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 939 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 940, नगरपालिका क्षेत्रात 367, शहरात 432 तर अन्य 200 जण आहेत. मंगळवारी 2 हजार 841 जणांची तपासणी केली. त्यातील 883 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. सक्रीय रूग्णसंख्या 4 हजार 555 झाली आहे. दिवसभरात 289 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 52 हजार 89 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 832 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 36, भुदरगड 18, चंदगड 15, गडहिंग्लज 28, गगनबावडा 2, हातकणंगले 92, कागल 19, करवीर 114, पन्हाळा 42, राधानगरी 5, शाहूवाडी 35, शिरोळ 3, नगरपालिका क्षेत्रात 94 कोल्हापुरात 296 तर अन्य 33 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 58 हजार 583 झाली आहे.
जिल्हÎात 2 हजार 654 जण होम कोरोंटाईन
शहरात 716 तर ग्रामीण भागात 1 हजार 938 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 4 हजार 341 अहवाल आले. त्यापैकी 3 हजार 823 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 843 अहवाल आले. त्यातील 622 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 652 रिपोर्ट आले. त्यातील 443 निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्हÎात मंगळवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या 22 जणांत 17 जिल्हÎातील आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये करवीर तालुक्यातील वाकरे येथील 75 वर्षीय महिला, कागल तालुक्यातील करंजिवणे येथील 65 वर्षीय महिला, जरगनगर येथील 58 वर्षीय महिला, पन्हाळा तालुक्यातील बेले येथील 38 वर्षीय पुरूष, राधानगरी तालुक्यातील तळाशी येथील 64 वर्षीय पुरूष, सिंधुदुर्ग जिल्हÎातील वैभववाडी तालुक्यातील सादुले येथील 72 वर्षीय पुरूष आणि दिघी येथील 49 वर्षीय पुरूष, हातकणंगले तालुक्यातील खोची येथील 76 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी आयजीएम हॉस्पिटलमध्ये शिरोळ तालुक्यातील शिरटी येथील 50 वर्षीय पुरूष, बंडगर मळा इचलकरंजीतील 60 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये राजारामपुरीतील हॉस्पिटलमध्ये बेळगाव जिल्हÎातील साखरवाडी निपाणी येथील 52 वर्षीय पुरूषाचा तर गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात आजरा तालुक्यातील लाटगाव येथील 78 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कदमवाडी येथील हॉस्पिटलमध्ये हातकणंगले येथील 84 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील मुडशिंगी येथील 86 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये रूईकर कॉलनी येथील 72 वर्षीय पुरूष तर शाहूपुरी येथील हॉस्पिटलमध्ये सोलापूर जिल्हÎातील मंगळवेढा तालुक्यातील खुपशिंगी येथील 47 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
राजारामपुरी तिसऱया गल्लीतील हॉस्पिटलमध्ये राजारामपुरीतील 40 वर्षीय पुरूष, गडहिंग्लज येथील हॉस्पिटलमध्ये आजरा तालुक्यातील भादवण येथील 75 वर्षीय पुरूष, तसेच सातारा जिल्हÎातील कराड तालुक्यातील मलकापूर येथील 65 वर्षीय पुरूष, हातकणंगले तालुक्यातील मिणचे सावर्डे येथील 45 वर्षीय पुरूष, शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील 65 वर्षीय पुरूष आणि शाहूवाडी तालुक्यातील गजापूर येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोना मृतांत 18 पुरूष आणि 4 महिलांचा समावेश आहे.
जिल्हÎात 832 पॉझिटिव्ह, 22 बळी
Aकोरोना मृतांमध्ये परजिल्हÎांतील 5, जिल्हÎातील 17,
सक्रीय रूग्णसंख्या साडेचार हजारांवर
कोरोना रूग्ण 832 ः एकूण ः 58583
कोरोनामुक्त 289 ः एकूण ः 52089
कोरोना मृत्यू 22 ः एकूण मृत्यू ः 1939
सक्रीय रूग्ण ः 4555