तंत्रज्ञानाला कल्पकतेची जोड
सुधाकर काशीद / कोल्हापूर
तंत्रज्ञानाला कल्पकतेची जोड देऊन कोल्हापूरच्या एका उद्योजक दाम्पत्याने चक्क दुधाच्या एटीएम मशीनची निर्मिती केली आहे. बँकेच्या ए.टी.एम मशीन सारखेच तंत्र असलेल्या या मशीनमधून अर्धा लिटर, एक लिटर, दोन लिटर असे सुट्टे दूध ग्राहकांना त्यांच्या दरवाजात मिळणार आहे. दूध आणण्यासाठी घराबाहेर न जावे लागता व प्लास्टिकच्या पिशवीचा दुधासाठी वापर न होता या एटीएम मशीनचा वापर करता येणार आहे.
देशात तामिळनाडू, दिल्ली, अहमदाबाद, मुंबईत अशी मशीन आहेत. पण कोल्हापुरातील उद्योजकाने आपल्या सहकाऱयांना सोबत घेऊन कोल्हापुरात हे मशीन तयार केले आहे. व त्यातील एक मशीन काल राजस्थानात रवानाही झाले आहे.
राजेंद्र हवालदार व दामिनी हवालदार यांच्या येथील जीनियस इंडस्ट्रीज मध्ये गेले तीन-चार महिने या मशीनची उभारणी चालू होती. यासंदर्भात राजेंद्र हवालदार यांनी माहिती देताना सांगितले की, कोल्हापुरात बनवण्यात आलेले ही मशीन एखाद्या छोटÎा टेम्पोत ठेवता येते. व उपनगर किंवा लांबच्या भागात नेता येते. यातील दुधाचा टँक सतत थंड राहिल अशी त्याची यंत्रणा आहे. इतर मशीनमध्ये फक्त विशिष्ट प्रमाणात दूध मिळू शकते पण या मशीनमध्ये लिटर ,अर्धा लिटर याबरोबरच जेवढÎा पैशाचे दूध हवे आहे तेवढÎा पैशाचे दूध घेता येते. नियमित दूध हवे असेल तर एटीएम सारख्या कार्डाचीही सोय आहे.
जीनियस इंडस्ट्रीच्या या हवालदार दाम्पत्याने आपल्या परीने एक वेगळा प्रयोग म्हणून या मशिनची निर्मिती केली आहे. यापूर्वी त्यांनी शितशवपेटी तयार केली होती. त्यामुळे काही कारणाने एखाद्या मृत व्यक्तीचा अंत्यविधी लांबणार असेल तर त्याचे शव एका काचेच्या पेटीत त्याची हेळसांड न होता ठेवण्याची सोय झाली होत या दाम्पत्याने आणखी एक वेगळा प्रयोग म्हणून त्यानंतर दुधाच्या एटीएमचा आराखडा तयार केला व तो कोल्हापूरातच पूर्ण करून राजस्थानला रवानानाही केला.
या मशीनमुळे दुधाच्या पिशवीला लागणाऱया प्लास्टिकचा वापर कमी होतो. लोक त्यांच्या दारात मशीन आल्यावर भांडÎात दूध घेऊ शकतात. या मशीनला वापरलेले सर्व साहित्य कोल्हापुरातले आहे. मशीन तयार करण्यासाठी सहकार्य करणारे 12 कर्मचारीही कोल्हापुरातलेच आहेत. एटीएमच्या तंत्रज्ञानाला आम्ही कोल्हापुरी कल्पकतेची जोड या मशीनच्या माध्यमातून दिली आहे. आणि पहिले मशीन काल रवानाही केले आहे.
राजेंद्र हवालदार, जीनियस इंडस्ट्रीज