प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 56 जणांचा मृत्यू झाला तर 2 हजार 131 नवे रूग्ण आढळून आले. तसेच 1 हजार 786 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 14 हजार 750 वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरूवारच्या तुलनेत नवे रूग्ण, कोरोना मृत्यूंत वाढ झाली आहे. सक्रीय रूग्णांत सातत्याने होणारी वाढ कम्युनिटी स्प्रेडचा धोका दर्शवत आहे. करवीर, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगलेसह पालिका क्षेत्रात शंभरांवर रूग्ण, शहरात सहाशेवर नवे रूग्ण दिसून आले.
जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 56 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 595 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 854, नगरपालिका क्षेत्रात 577, शहरात 728 तर अन्य 436 आहेत. मृतांमध्ये परजिल्हय़ांतील तिघे आहेत. दिवसभरात 1 हजार 786 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 89 हजार 27 झाली आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 2 हजार 131 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 41, भुदरगड 85, चंदगड 58, गडहिंग्लज 64, गगनबावडा 35, हातकणंगले 193, कागल 24, करवीर 399, पन्हाळा 173, राधानगरी 39, शाहूवाडी 20, शिरोळ 120, नगरपालिका क्षेत्रात 153, कोल्हापुरात 639 तर अन्य 88 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 7 हजार 372 झाली आहे.
दिवसभरात 11 हजारांहून अधिक स्वॅबची तपासणी
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 2 हजार 854 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 377 निगेटिव्हआहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 4 हजार 54 अहवाल आले. त्यातील 3 हजार 442 निगेटिव्हआहेत. ट्रुनेट टेस्टचे 4 हजार 440 रिपोर्ट आले. त्यातील 3 हजार 264 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 11 हजार 348 जणांचे स्वŸब रिपोर्ट आले.
……………………
कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 639 1472 2131
आजपर्यतचे बाधीत 31206 76166 1,07,372
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1786 89027
दिवसभरातील मृत्यू 10 46 56
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 728 2867 3595
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 343 2377 2854
अँटीजेन 612 3443 4954
ट्रुनेट 1176 3264 4440