राज्यातील 24 कृषी उत्पादनांचाही समावेश, 27 उत्पादक कंपन्या सहभागी, चेन्नईत नोंदणी करावी लागणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील 24 कृषि उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले असून या अंतर्गत 27 उत्पादक संस्था कार्यरत आहेत. यामध्ये कोल्हापुरी गुळाचाही समावेस आहे. या वस्तूंचे मार्केटींग करण्यासाठी पणन महामंडळामार्फत विशेष योजना आखल्या आहेत. या माध्यमातून या कृषी उत्पादनांचे `ब्रँडींग’ करण्यात येणार आहे. यासाठी चेन्नई येथे नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.
भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्यामुळे, हवामान, संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतात. अशा कृषी उत्पादनांसाठी चिन्हांकन, मानांकन बाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱयांची नोंदणी करणे तसेच या शेतमालाची विक्री व्यवस्था, निर्यात करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता पणन मंडळाचे प्रयत्न सुरु होते. अशा उत्पादनांची नोंदणीसाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे त्या त्या प्रदेशातील स्थानिक उत्पादकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. अशी माहिती पणनचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली.
नोंदणीनंतर असे लाभ मिळणार
प्रचार व प्रसिध्दीसाठी प्रशिक्षण
एक दिवसाच्या प्रशिक्षणासाठी 10 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी संस्थेने पुर्व मान्यतेसाठी कृषि पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. तालुका कार्यक्षेत्रात तीन प्रशिक्षण कार्यक्रम या प्रमाणे जिल्हÎात किमान 15 प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता नोंदणी-शासकीय नोंदणी शुल्कापोटी येणाऱया खर्चाच्या 50 टक्के अथवा प्रति लाभार्थी कमाल 800 रुपये मर्यादेपर्यंत अनुदान संबधित कृषि उत्पादनाचे मालकी असणाया संस्थेला अनुदान देय राहील. याकरीता शेतकऱयांच्या 7/12 उताऱयावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
उत्पादनांची मुल्यसाखळी विकसीत करणे- उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, भेसळीला प्रतिबंध करणे, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात उत्पादित होणारी उत्पादने चिन्हासह विक्री करण्यासाठी बाजार विकास करीता येणाऱया खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत-जास्त 3 लाखापर्यंत अर्थसहाय्य संबधित संस्थेला मिळणार आहे.
उत्पादनांच्या स्टॉलकरिता अर्थसहाय्य
भौगोलिक मानांकन उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करीता पणन मंडळाच्या फळे व शेतमाल महोत्सव योजनेअंतर्गत असलेल्या स्टॉलकरीता प्रति स्टॉल 3 हजार अनुदान देण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा
योजनेची अंमलबजावणी पणन मंडळाच्या राज्यातील 8 विभागीय कार्यालयामार्फत काम सुरु आहे. कोल्हापूर विभागातील मानांकन प्राप्त संस्थांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पणन कार्यालयाशी संपर्क साधावा. सुभाष घुले – उपसरव्यवस्थापक पणन, कोल्हापूर