टोप / वार्ताहर
मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापुर जिल्हा क्रशर, डंपर, व खाण असोसिएशन टोप यांच्यावतीने महसुल विभागाच्या होणार्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सोमवार दि १ फेब्रुवारी रोजी वतीने कुटुंबासह डंपर व गाढव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची माहीती मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी मोहन साधु पाटील, रमेश पोवार, विलास नलवडे, हणंमत पाटील, दादा शिंदे प्रमुख उपस्थित होते.
खाण व्यवसायावर विविध विकास कामे अवलंबुन असतात. रोजगार नसल्याने कर्जे काढुन क्रशर व्यवसाय उभे केले आहे. डंपर विकत घेतले आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले असताना महसुल विभागाचे आधिकारी वेळोवेळी महसुल भरुन सुध्दा क्रशर व्यावसायिकांना खनिजकम आधिकारी प्रांताधिकारी, तहसिलदार, मंडल आधिकारी, तलाठी, कोतवाल ही मंडळी वारवार त्रास देत आहेत. खोट्या तक्रारी दाखल करत आहे. खाणधारक यांनी शासनाकडे खाण परवानाची मागणी केली असतात परवानगीसाठी पैशाची मागणी केली जाते. त्यातून रॉयल्टी रक्कम भरणा केला तर परवाना हा फक्त ७ दिवसासाठी दिला जातो. तसेच सदर परवाना आदेशावर
फक्त दोन डंपरचे नंबर नोंद करून त्यामधूनच वाहतूक करण्याची अट घातली जाते. दुसरे डंपरमध्ये माल भरले तर त्यावर अनधिकृत गौण खनिज वाहतुकीची कारवाई केली जाते. हे पूर्ण चुकीचे आहे. सदरचा मनमानी नियम लावून गौण खनिज यंत्रणा प्रशासन सदरच्या व्यवसायावर आपली पकड़ करून व्यवसायधारकांना वेठीस घरत आहेत. व दंडाची कारवाई करणेची धमकी देऊन त्यांच्याकडे भरमसाठ पैशाची मागणी करत आहेत. शासकिय सुट्टि असताना देखिल आधिकारी सुट्टिवर न जाता कारवाई साठि पुढे सरसावलेले असतात.
शासनाने गौण खनिज संदर्भात मशिनरी,वाहनावर लाखो रुपये दंड आकारणी करणेसाठी घेतलेला शासन निर्णय त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे पक्त गौण खनिजावर दंड आकारणी करणे. तसेच गौण खनिज परवाना त्वरित देणे व सदरच्या परवान्याची मुदत हि एक वर्षासाठी ठेवणे व स्थानिक वाहनांना दिलेले सदरचे वाहतूक पास मान्य करणे. या वरील सर्व मागणी व वाबीचा शासनाकडून पूर्तता करून घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव, डंपर व्यवसाय मालक,चालक,कामगार आणि सर्व कुटुंब व मुलांसह धडक मोर्चा काढणे बैठकित इशारा दिला आहे.
यावेळी मोहन साधु पाटील , रमेश पोवार,विलास नलवडे,हणंमत पाटील, दादा शिंदे, विश्र्वनाथ पाटील,सागर मगदुम,विक्रम पाटील मारुती शिंगाडे,विकास चौगुले,संभाजी पोवार, रंगराव भोसले,अविनाश कलकुटगी यांच्या जिल्हातील खाण, क्रशर, डंपर धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.