कोल्हापुरात पॉझिटिव्ह 728, डिसचार्ज 668
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात गुरूवारी रात्री 8 वाजेपर्यत एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आला नाही. चौघांना डिसचार्ज मिळाला आहे. आजपर्यत जिल्हय़ात 628 पॉझिटिव्ह तर त्यापैकी 664 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
जिल्हय़ात रात्री 8 वाजेपर्यत परजिल्हय़ांतून आलेल्या 1 हजार 452 जणांची तपासणी केली. त्यापैकी 142 जणांचे स्वॅब घेण्यात आले. यातील 107 जणांना आयसोलेटेड केले आहे. दिवसभरात चौघांना डिसचार्ज मिळाला आहे. रात्रीपर्यत आलेल्या 134 स्वॅब रिपोर्टपैकी 2 पॉझिटिव्ह, 1 रिजेक्ट आहे. उर्वरित 130 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. आजअखेर जिल्हय़ात 728 कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी 668 कोरोनामुक्त झाल्याची माहिती डॉ. केम्पीपाटील यांनी दिली.