प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवारपासून (11 जुलै) तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.
गायकवाड म्हणाले, शहरातही कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी ही साखळी तोडण्याच्या प्रयत्नासाठी येत्या शनिवारपासून (ता. 18, 19 व 20 जुलै) सलग तीन दिवस सराफ बाजार, सर्व दुकाने व शोरूम बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याची ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.