जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची वैदयकीय शिक्षण विभागाचे सचिवपदी बदली
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची वैदयकीय शिक्षण विभागाचे सचिवपदी म्हणून मंगळवारी रात्री बदली झाली. त्यांच्या जागी अकोला येथील महाराष्ट्र राज्य बीज उत्पादक महामंडळाचे कार्यकारी संचालक राहुल अशोक रेखावार यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्च 2019 मध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. तत्पूर्वी ते राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत लोकसभा, विधानसभा, पुणे पदवीधर निवडणुकीसह २०१९ मध्ये कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुर व गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या संकटकाळात प्रभावी काम केले आहे.
त्यांची मंगळवारी रात्री वैदयकीय शिक्षण विभागाचे सचिवपदी बदली झाली. याबाबतचे आदेश मंत्रालयातुन जारी करण्यात आले. तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी अकोला येथील महाराष्ट्र राज्य बीज उत्पादक महामंडळाचे कार्यकारी संचालक राहुल अशोक रेखावार यांची बदली झाली.