प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेनेने सभासद नोंदणी अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यात 1 लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट आहे. ते पुर्ण करण्यासाठी शिवसैनिकांनी सक्रीय रहावे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक समोर आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी केले.
शिवसेनेची आरटीओ ऑफिसमोर नागाळा पार्क शाखा आहे. या शाखेचे नूतनीकरण आणि नामफलकाचे अनावरण सोमवारी खासदार मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक शरद सामंत होते. कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, महिला आघाडी प्रमुख शुभांगी पवार, शाखाप्रमुख संजय जाधव यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
खासदार मंडलिक म्हणाले, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेला मोठे पाठबळ मिळाले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करा, ग्रामीण भागात चांगली नोंदणी होण्यासाठी प्रयत्नशील रहा. करवीर तालुक्यातून 1 हजार सभासद नोंदणी एकाच दिवसात झाली आहे. शहरातही याच पद्धतीने महापालिकेत शिवसेनेची सत्ता येण्यासाठी नोंदणी करा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, पक्षाने प्रत्येक जिल्हÎाला 1 लाख सभासद नोंदणीचे टार्गेट दिले आहे. आतापर्यत 2 महिन्यांत जिल्हÎात 75 हजार इतकी सभासद नोंदणी झाली आहे. महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद नोंदणीसाठी प्रयत्नशील आहोत. शिवसेनेची प्रत्येक शाखा ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडवण्याचे हक्काचे ठिकाण बनावे, असे त्यांनी सांगितले.
धोंडिराम शेळके यांनी स्वागत केले. प्रकाश पाटील यांनी आभार मानले. यावेळी रवी पाटील, अभिजित बुकशेट, बिडकर, राजू जाधव आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
उड्या मारणारे अनेक….
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शिवसेनेत 1990 पासून आपण सक्रीय आहोत. आपण पदाची अपेक्षा कधीच केली नाही. विधायक कामे केली. मला विधान परिषदेवर घ्या, महामंडळ द्या..अशी सत्तेसाठी उडÎा मारणारी अनेक मंडळी आहेत. पण शिवसेनेची आजही प्रामाणिक आहोत, भविष्यातही राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.