संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी दूर : 2 ऑगस्टपर्यंत https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास
प्रतिनिधी / कोल्हापूर
अकरावी सीईटीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास पुन्हा एकदा सोमवारपासून सुरूवात झाली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 या दरम्यान सीईटी होणार आहे. 2 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास मुदत असून विद्यार्थ्यांनी https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.
अकरावी सीईटीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया 21 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून तांत्रिक कारणाने बंद करण्यात आली होती. तांत्रिक अडचणी दूर झाल्याने पुन्हा सोमवारपासून संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावर आपला ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक अपडेट करावयाचा आहे. सीईटी कोणत्या माध्यमातून देणार तो पर्याय आणि आपला प्रवर्ग देणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 20 ते 21 जुलै या कालावधीत अर्ज भरलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर टाकल्यास त्यांनी भरलेला अर्ज उपलब्ध होणार आहे. शंकांचे निरसन करण्यासाठी संकेतस्थळावर हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अकरावीची सीईटी या विषयावर
इंग्रजी : 25
गणित : 25
विज्ञान आणि तंत्रज्ञान : 25
सामाजिकशास्त्रे : 25
कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना सीईटी अर्ज भरण्यासंदर्भात आलेल्या अडचणींचे निरसन करण्यासाठी 7588636301, 8007597071 मोबईल क्रमांकावर उपलब्ध करून दिला आहे. अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
बारावी निकालातील त्रुटीसंदर्भात आज कँप
कोल्हापूर विभागातील 860 शाळा, महाविद्यालयांनी बारावीचा ऑनलाईन निकाल सबमिट केला आहे. या निकालात राहिलेल्या किरकोळ त्रुटी दुरूस्त करण्यासाठी आज ाdन( दि. 27) सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत कँपचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तिन्ही जिल्हÎातील संबंधीत शाळा, महाविद्यालयांनी त्रुटी दुरस्त करण्यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळात उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव कुलाळ यांनी केले आहे.