प्रतिनिधी / जयसिंगपूर
सांगली – कोल्हापूर महामार्गावरील चिपरी बेघर फाटा येथील पुष्पराज परमिट रुम बिअर बार मध्ये अज्ञातांनी घुसून 35940 किंमितीचे दारूचे नग लंपास केले आहेत. याबाबत सदानंद यशवंतराव जाधव वय वर्ष 54 राहणार रामलिंग कॉलनी संभाजीपुर यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात 2 चोरट्यांचा विरोधात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 2 ते 2.30 च्या दरम्यान घडली आहे. यावर समजलेली माहिती अशी.
लॉकडाऊन असल्याने परमिट रम व बिअर बार सध्या बंदच आहेत. अज्ञाताने रात्रीच्या वेळी शटर चे कुलूप उचकटून आत प्रवेश करून रॉयल स्टाग कंपनीच्या 76 नग तसेच एमपीरिअल ब्लू कंपनीच्या 80 नग मॅक्डोल no – 1 च्या 46 नग व डॉ ब्रॅण्डिं कंपनीचे 40 नग असे मिळून 35940 दारू अज्ञातने चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास बिट अंमलदार कोठीवले करीत आहे.