प्रतिनिधी / शाहुवाडी
जैवविविधतेचा समृध्द असा वारसा लाभलेल्या आंबा परिसराचा शासनाच्या पर्यटन विकास आराखड्यात समावेश करणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने पर्यटन आढावा बैठक प्रसंगी केले.
आंबा ता. शाहूवाडी येथे आयोजित केलेल्या आंबा पर्यटन विकास आराखडा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील होते. प्रारंभी स्वागत राजेंद्र लाड यांनी केलेप्रास्ताविक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गद्रे यांनी केले. खासदार धैर्यशील माने पुढे म्हणाले की, जैवविविधतेने समृध्द व ऐतिहासिक वारसा जपलेल्या आंबा परिसरासराचा विकास आराखडा सहयाद्री व्याघ्र प्रकल्प, वनविभाग, महसुल, कृषी, पाटबंधारे,पोलिस या विभागाच्या समन्वयातून पर्यटन विकास आराखडा तयार करुन टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी खास प्रयत्न करू. यामुळे व्यावसायिक, परिसरातील व्यावसायिक व सामान्य नागरिकांना रोजगार मिळेल.
तहसिलदार गुरू बिराजदार, पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील, सल्लागार अजिंक्य बेर्डे, विठ्ठल पाटील, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा दळवी, निलेश कामेरकर यांनी पर्यटन विकास आराखड्यास पूरक मुद्दे मांडले. पर्यटन विकास आराखड्यात अंतर्गत केर्ली धबधबा, सासण कडा, घाट,धरणे दुरूस्तीसह बायोडाव्हसी पार्क, वनौषधी संशोधन केंद्र, जंगल वाचन पदभ्रमती मार्ग, राधा फळावरील प्रक्रिया उद्योग, देवराई संवर्धन, जंगल विकास आराखडा आदीचा समावेश या आराखड्यात करावा. अशी मते उपस्थितांनी मांडली.
यावेळी उपसभापती विजयराव खोत,युवा नेते अमरसिंह पाटील, सुरेश पारळे, विजय देसाई, वन परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे, सहायक गटविकास अधिकारी संदिप कोटकर, फौज. प्रियांका सराटे, माजी सरपंच अनिल वाय कुळ यांच्यासह हॉटेल व रिसॉर्सराटे, माजी सरपंच अनिल वाय कुळ यांच्यासह हॉटेल व रिसॉर्ट व्यावसायिक, पदाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आभार राजेंद्र लाड यांनी मानले.