प्रतिनिधी/शाहुवाडी
शाहूवाडी तालुक्यातील आकुर्ळ जंगलात डुकराची शिकार बंदूकीने करताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आल्याने शिकार करणारे युवक पसार झाले आहेत. वनविभागाने पकडलेला संशहित अक्षय कोळेकर ही पसार झाला आहे.
वनविभागातुन मिळालेली माहिती अशी, वनविभागाच्या जंगलात आज, बुधवारी सकाळच्या सुमारास वनरक्षक जीवन कांबळे, वनमजुर रामा केसरे, विष्णू कदम हे गस्त घालीत होते. दरम्यान यावेळी जंगलात आरडा, ओरडा चालू असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात आले असता पाहणी केली असता चार ते पाच युवक डुकराची शिकार करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी पळून जात असलेल्या अक्षय नामदेव कोळेकर याला पकडून ठेवले होते. पळून गेलेल्या युवकांना इतर दोन वनकर्मचारी शोधत असताना अक्षय कोळेकर हा देखील पळून गेला. वनकर्मचाऱ्यानी वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांना सदर घटनेची माहीती दिली.
तर शिकारीत
मृत डुकराचे शवविच्छेदन डॉ.
गबाले यांनी केले.
डुकराच्या कानाखाली
बंदूकीची गोळी लागली होती.
व त्याच्या अंगावर
फरशीचे घाव दिसत होते.
वनविभागाने चौकशीसाठी
काही युवकांना ताब्यात घेतले
होते. डुकराची शिकार
करून पसार झालेल्या युवकांचा
वनकर्मचारी शोध घेत आहेत.