प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोविड १९ लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली आहे. आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आयजीएम रुग्णालयात २४० डोस उपलब्ध झाले असून आज १०० जणांना डोस देण्यात येणार आहे.
यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, प्रसाद खोबरे, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, जेष्ठ नगरसेवक सुनील पाटील तसेच वैद्यकीय अधीक्षक रविकांत शेट्ये, डॉ. महेश महाडिक, डॉ. संदीप मिरजकर, भारत शिंदे यांच्यासह डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी आदी उपस्थित होते.