पाचगाव/प्रतिनिधी
आर के नगर परिसरातील पी. डी. भोसले नगर मधील एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मंगळवारी पहाटे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मोरेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी. व्ही. तेलवी यांनी हा परिसर तात्काळ सील केला असून परिसरात औषध फवारणी करण्यात केली आहे. या महिलेच्या कुटुंबियांना तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले आहे.