राजेंद्र होळकर / इचलकरंजी
शहरातील आयजीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरला मंगळवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. पण वॉर्डबॉयने समयसुचकता दाखवत व्हेंटिलेटरचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे आयजीएम रुग्णालयातील मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती समजताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने अतिदक्षता विभागातील रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली.