चार दिवसांत 12 पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 30 वर,कोल्हापूर रेड झोनमध्ये
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर आणि इचलकरंजीतील दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आले. चार दिवसांत 12 जण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 30 वर पोहोचल्याने जिल्हा कोरोना रेड झोनमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हय़ात गुरूवारी रात्री उशिरा राधानगरी तालुक्यातील बापलेक कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 28 वर पोहोचली होती. दिवसभरात शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून 717 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले, पण सायंकाळी कोल्हापूर शहरातील 1 आणि इचलकरंजी येथील 1 असे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 30 वर पोहोचली आहे.