अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसानी वेळीच डिझेल कॅन काढून घेतल्याने टळली मोठी दुर्घटना
प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजीत एका सामाजिक कार्यकर्त्यांने आत्मदहनाचा प्रयत्न केला असता यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा एका महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गाळ्याचे बांधकामाला पालिकेने अटकाव केला असता गाळेधारक महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
इचलकरंजीमधील नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळील मुव्हेकेल गाळे मंजूर झाले आहे. पण गाळेधारक मुव्हेकेल ऐवजी पक्के बांधकाम केले जात आहे. त्याला पालिकेचे मुख्याधिकाऱ्यानी बांधकाम करु नये, याबाबतचा चार दिवसापूर्वी आदेश काढला आहे. तरीदेखील गाळेधारक शनिवारी सकाळी गाळ्याचे बांधकाम करु लागले. त्याला पालिकेने अटकाव केला असता गाळेधारक महिलेने स्वतः च्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसानी संबंधित महिलेच्या दिशेने धाव घेवून वेळीच डिझेलचा कॅन काढून घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
यावेळी गाळेधारक व पालिकेच्या अधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या वादावादीमुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घडला प्रकाराने जलशुद्धीकरण केंद्राजवळील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पालिकेने अग्निशमक दलाचा एक पाण्याचा बंब व रुग्णवाहिका देखील ठेवली आहे.