वार्ताहर / कबनूर :
कबनुर चंदुर ओढ्यामध्ये उघड्यावर मटन चिकन वेस्टेज कचरा एका व्यवसायिकांने टाकला होता. नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामपंचायतीने त्या व्यवसायिकावर तात्काळ कारवाई करत पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कबनूर येथील ओढ्यामध्ये किचन सेंटर व्यवसायिकांनी चिकन वेस्टेज कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली होती. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने दक्षता घेऊन एका चिकन सेंटर दुकानदाराला चिकन कचरा ओढ्यामध्ये टाकताना पकडले. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. गावातील इतर व्यावसायिकांना याबाबत सक्त ताकीद देण्यात आली.
या प्रश्नाबाबत ग्रामपंचायत सभागृहात सरपंच शोभा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.हा व्यवसाय घरात सुद्धा चालू ठेवायचा नाही असे त्यांना सक्त सूचना दिली.यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, मण्डल अधिकारी जे .आर. गोन्साल्विस, तलाठी एस.डी. पाटील, सदस्य समीर जमादार, प्रवीण जाधव, नितीन का डाप्पा, शिवानंद स्वामी, संजय कट्टी, सुरेश आडके उपस्थित होते.