कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ हा सेनेचा बालेकिल्ला आहे. अपवाद वगळता यावर सेनेची सत्ता होती. त्यामुळे ही जागा सेनेला मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून याठिकाणी सेना निवडणूक लढवणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी जाहीर केले.
विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यास शिवसेना इच्छुक आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत शिवसेनेला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी करून ही पोटनिवडणूक शिवसेना लढवणार असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेनेची आज (सोमवारी) शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.