पुलाची शिरोली/ वार्ताहर
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहन धारकांच्यावर कारवाई सुरु केली आहे. यावेळी सुमारे अठरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी शिये बावडा रोडवरील रामनगर येथे ऊसाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीची धडक बसून डाॅक्टर मुलगी जागीच ठार झाली होती. तसेच तरुण भारत मधून ” ऊस वाहतूक सुरू झाली आहे ट्रॅक्टर ट्राॅली पासून सावधान” ! या वृत्ताची दखल घेऊन गुरुवारी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. किरण भोसले यांनी सांगलीफाटा व शिये फाटा येथे पथके नेमून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्राॅली ची तपासणी सुरू केली आहे . वाहनांचे पासिंग,ड्रायव्हिंग लायसन वाहनांची स्थिती अशा अनेक गोष्टींचीह काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. यावेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसलेल्या ट्रॅक्टर चालकांच्याकडून सुमारे अठरा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच पोलिसांच्याकडून ट्राॅलींना रिप्लेक्टर बसविण्यात आले. पोलिसांनी हि मोहीम कडक व व्यापक प्रमाणात राबवावी अशी मागणी वाहन चालकांच्यातून होत आहे.