प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रदेश युवक काँग्रेसच्या कमिटीवर येथील ऋषिकेश सर्जेराव पाटील यांची निवड झाली आहे. पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून पाटील यांना युवक काँग्रेसचे युवा जोडो अभियान आणि सुपर 1000 उपक्रमासाठी काम करावे लागणार आहे.
सुपर 1000 उपक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गुणवान युवकांना उमेदवारी देऊन भविष्यातील नेत्यांचा शोध घेण्यात येतो. या निवडीसाठी पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे सहकार्य लाभले. पुरोगामी चळवळीत कार्यरत असणार्या पाटील यांचे ब्लॉगवरील लिखाण प्रसिद्ध आहे.