एकाच दिवशी विविध भागातील चौकाचौकांत होणार थुंकीमुक्त कोल्हापूरचा नारा, लोकांचे सहकार्य अपेक्षित, थुंकीमुक्त कोल्हापूर हा संदेश जनमाणसांपर्यत पोहोचविण्याचा निर्धार, पुढील दहा दिवसातच ठिकठिकाणी ऍण्टी स्पिट चळवळ
संग्राम काटकर / कोल्हापूर
अनेकांना गुटखा, मावा खाऊन कुठेही पिचकारी मारण्याची सवय असते. अनेक जण तर रस्त्यावरुन ये-जा करताना सहज थुंकत असतात. अनेकांनी तर शाळा, अपार्टमेंट, बागा, चित्रपटगृहे, प्रसिद्ध चौक, तिकटÎा, कार्यालये, क्रीडांगणे ही जणू पिचकारीची, थुंकण्याची ठिकाणं बनवली आहेत. हळूच पिचकारी मारुन नामानिराळे होणारे अनेकजण रोज पहायला मिळतात. आपण कुठे थुंकत आहोत याचा विचारही ते करत नाहीत. आता मात्र असे चालणार नाही. कारण थुंकणाऱया बहाद्दरांवर ऍण्टी स्पिट मुव्हमेंट कोल्हापूर कृती समितीचा चळवळीच्या माध्यमातून वॉच राहणार नाही. कावळा नाका येथील छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याजवळून सुरु केलेली चळवळ लवकरच शहरातील मोक्याच्या जागी एकाच दिवशी केली जाणार आहे.
सध्या कोरोनाचा महाभयानक काळ सुरु आहे. त्याचे संक्रमण कोणाकडून कोणाकडे होईल, हे सांगता येत आहे. साधे थुंकणेसुद्धा आजच्या घडीला कठिण झाले आहे. माणसाची थुंकीच कोरोनाचा फैलाव करत असल्याचे प्रशासन सातत्याने सांगत आहेत. असे असूनही मावा, गुटखा खाऊन रस्त्यांवर पिचकाऱया मारणारे व सहज थुंकण्याचे प्रकार काही कमी झालेले नाहीत. याला आळा बसावा या हेतूने कविता जांभळे, राहुल राजशेखर, दीपा शिपुरकर, सारिका बकरे, आनंद आगळगावकर, अभिजित गुरव यांनी एकत्र येऊन ऍण्टी स्पिट मुव्हमेंट कोल्हापूर कृती समिती तयार केली. या समितीची माहिती समजताच उद्योजक, कलाकार, तरुण, तरुणी, महिला, सामान्य नागरिक, खेळाडू यांच्यासह शासकीय, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील लोक समितीत दाखल होऊ लागले. या सर्वांनी मिळवू ऍण्टी स्पिट चळवळ राबविण्याचे ठरवताना थुंकीमुक्त कोल्हापूर हा संदेश जनमाणसांपर्यत पोहोचविण्याचा निर्धार केला.
कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळ्याला अभिवादन करुन रविवारी अँटी स्पीट मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी
ऍण्टी स्पिट चळवळीला सुरुवात केली. रस्त्यावरुन ये-जा करणाऱयांपर्यंत थुंकीमुक्त कोल्हापूरसंदर्भातील घोषणा पोहोचविल्या. अनेकांनी चळवळीत सहभागी होऊन माहितीपत्रकेही वाटण्यात पुढाकार घेतला.
चळवळीतील जनमाणसांच्या सहभागामुळे ऍण्टी स्पिट चळवळ शहराच्या मोक्याच्या जागी एकाच दिवशी करण्याचा निर्णय
ऍण्टी स्पिट मुव्हमेंटने घेतला आहे. लवकरच यासंदर्भात नियोजन करुन पुढील दहा दिवसातच ठिकठिकाणी ऍण्टी स्पिट चळवळ केली जाणार आहे. या चळवळीतून शाळा, अपार्टमेंट, बागा, चित्रपटगृहे, प्रसिद्ध चौक, तिकटÎा, कार्यालये, क्रीडांगणे यांच्याकडे पिचकारी मारण्याचे, थुंकण्याचे ठिकाणे नव्हे तर कोल्हापूरचे वैभव म्हणून पहा, अस जनमाणसांच्या मनावर बिंबवले जाणार आहे. थुंकून सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करण्याचे पाप कोणी करु नये. आपण कुठे थुंकत आहोत, याची थोडीतरी लाज बाळगा असेही चळवळीतून लोकांना सांगितले जाणार आहे.
पुढील चळवळ छत्रपती शिवाजी चौकातून…
गुटखा, माव्याची पिचकारी मारण्याबरोबरच थुंकण्यातून कोरोनाबरोबरच टीबी, स्वाईन फ्ल्यूसह अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो, हे लोकांना पटवून देणे हा देखील चळवळीचा मुख्य उद्देश आहे. हा घेऊन लवकरच छत्रपती शिवाजी चौकातून ऍण्टी स्पिट चळवळ सुरु केली जाणार आहे, असे चळवळीच्या कार्यकर्त्या दिपा शिपुरकर यांनी सांगितले.