324 कामगारांचे स्वॅब घेण्यात आले
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सहकार्याने औद्योगिक कामगार व उद्योजकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये 324 जणांचे स्वॅब घेण्यात आले.
सर्व उद्योगांमध्ये कोवीड-19 प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी सुरू आहे. यामध्ये सर्व उद्योजक व कामगारांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवून काम करणे, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे, परिसर निर्जंतूक करणे असे उपाय केले जात आहे. कोरोनाबद्दल असोसिएशनतर्फे वेळोवेळी जनजागृतीही करण्यात येत आहे.
उद्योग सुरू ठेवायचे असल्यास 45 वर्षावरील उद्योजक व कामगारांनी लस घेणे तसेच 45 वर्षाच्या आतील लोकांनी आरटीपीसीआर चाचणी घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमिवर हे तपासणी शिबीर घेण्यात आले. या तपासणीचे रिर्पोर्ट आज बुधवारी मिळणार आहे.
यावेळी महापालिका उपायुक्त श्रीमती शिल्पा दरेकर, असोसिएशनचे अध्यक्ष . सचिन मेनन, आर.एस.काटकर कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष हर्षद दलाल, प्रसन्न तेरदाळकर, संजय शेटे, डॉ.संजना बागडे, रंविद्र पोवार, श्रीकांत दुधाणे, संजय अंगडी,जयदिप मांगोरे, चंद्रकांत चोरगे,किरण चरणे,प्रदीप व्हरांबळे,प्रशांत मोरे आदी उपस्थित होते.