येथे तयार होतात दिवसाला एक लाख मास्क
वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कॉलेज युवतीसह महिलांना कणेरीमठ येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये मास्क शिवण्याच्या उद्देशाने मिळत आहे. या कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेल्या एक वर्षापासून मास्क शिवण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. यामध्ये दर दिवशी एक लाख मास्क शिवले जातात. लहान मुलांपासून ते वेगवेगळे डिझाईनचे मास्क याठिकाणी शिवले जातात. त्याचबरोबर सिंगल लेयर, डबल लेयर व थ्रीडी मास्क सुद्धा या ठिकाणी बनवले जातात.
या मास्कला जिल्ह्यासह परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने अनेक तरुणी घरीच बसून आहेत. त्यांचा हाताला काम देण्याचे काम या केंद्राने केले आहे. या ठिकाणी अनेक मुली अकाउंटच काम, मास्क शिवण्याचे काम करत आहेत. या मास्क शिवण्याच्या कामाने मोठा आधार या महाविद्यालयीन युवतींना मिळाला आहे. दिवसागणिक सरासरी एक महिला दोनशे रुपये ते सहाशे रुपये मिळवू शकते एवढा रोजगार या ठिकाणी उपलब्ध केला आहे. त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा आपल्या आईसोबत बसून हे मास्क पॅकिंगचे काम घरी करत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राच्या व्यवस्थापिका प्रतिभा ठोंबरे यांनी या वेळी सांगितले.
या केंद्रामध्ये जवळपास बाराशे महिला काम करतात. एवढे काम आपल्याकडे असून सध्या येथे वेगवेगळ्या कंपन्यांची ऑर्डरदेखील स्विकारल्या जातात. एखाद्या कंपनीचा लोगो लावून त्या कंपनीचे मास्क शिवून द्यायचे असतील तर ते सुद्धा काम आपण याठिकाणी करत असल्याचे व्यवस्थापिकांनी सांगितले. हे मास्क चार रुपयांपासून शंभर रुपयेपर्यंत इथे आपण बनवत असून याला दिवसागणिक जोरदार मागणी वाढत आहे. महाविद्यालयीन युवतींना हाताला काम भेटल्याने त्यांच्याकडूनही