भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / कोल्हापूर
आजची महिला समाजामध्ये आपले कर्तुत्व दाखवून उल्लेखनीय कामगिरी करत आहे. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये महिलांनी आपली जबाबदारी पार पाडली. कठीणा प्रसंगीही त्या मागे हटल्या नाहीत. राज्यात अशा कतृत्वान महिलांचे संघटन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुढाकार घेईल, असे प्रतिपान भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी केले. खापरे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या हस्ते कतृत्ववान नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. शहर कार्यालय व हॉटेल आयोध्ये येथे त्यांच्या उपस्थित कार्यक्रम झाला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, कोल्हापूर महिला मोर्चा प्रभारी सुवर्णा पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, पिंपरी चिंचवड महिला पदाधिकारी संजीवनी पांडे, सातारा जिल्हा उपाध्यक्षा निर्मला पाटील, भाजपा महीला मोर्चा कोल्हापूर अध्यक्षा गायत्री राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती
त्या म्हणाल्या, महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता समाजामध्ये प्रबोधन करणे गरजेचे असून यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांचे प्रश्न सोडवण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध प्रकोष्ठ तयार करणार असून यामाध्यमातून विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचे समाजहितासाठी उपयुक्त असे संघटन करणार आहे. यांनतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक गायत्री राउत यांनी केले. सूत्रसंचालन गौरी जाधव यांनी केले.