वार्ताहर/कबनूर
वाढत्या संसर्गामुळे कबनूरात आज दिवसभरात आणखीन नवीन सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर एका 64 वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे कबनुर ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
कबनूर ता. हातकणंगले येथील गांधी विकास नगर भागात चार, पठाण गल्ली परिसरात एक, दत्तनगर परिसरात एक असे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यातील दत्तनगर गल्ली नंबर 6 मधील कोरोना बाधित एका 64 वर्षीय पुरुषाचा उपचार चालू असताना मृत्यू झाला. यामुळे कबनुरातील एकूण संख्या 86 वर गेली आहे. तसेच आज अखेर आठ जणांचा मृत्यू झाला आहे .
दिवसेदिवस वाढती संख्या पाहता एक चिंतेचा विषय बनलेला आहे. बाधित परिसरात ग्रामपंचायत व वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच कोरोची तालुका हातकणंगले येथे आज आणखीन एक लोकमान्य नगर मधील महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे येथील संख्या 48 झाली आहे.