वार्ताहर/कबनूर
कबनुरात कोरोनाची साखळी तुटता तुटेनासी झाली आहे. परिणामी दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. गावात आणखीन पंधरा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कबनूर गावने शतक ओलांडून गेल्याने एकूण संख्या 106 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात आढळलेल्या रुग्णामध्ये दत्तनगर गल्ली एक, मनेरे मळा परिसर 2, गंगा नगर गल्लीत सात, अष्टविनायक कॉर्नर परिसरात तीन, लक्ष्मी माळ परिसरात एक, सिद्धार्थ नगर झोपडपट्टी परिसरात एक असे एकूण पंधरा जणांना लागण झाल्याचे आढळून आले आहे.
आज अखेर एकूण मयत संख्या अकरा झाली आहे. 51 रुग्ण बरे झाले आहेत. ग्राम पंचायतवतीने हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे परंतु दिवसेंदिवस वाढच होत असल्यामुळे चिंतेत भर पडलेली आहे. तसेच कोरोची तालुका हातकणंगले येथे आज नव्याने लोकमान्य नगरांमध्ये तीन महिलांना लागण झाल्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येथील संख्या 62 वर पोहोचली आहे.