कोरोना व पूरपूर्व परिस्थिती बाबत केले मार्गदर्शन
सांगरुळ / वार्ताहर
करवीरच्या तहसीलदार शितल मुळे -भांबरे यांनी वाडीपीर, आरे, बहिरेश्वर, कोगे, बाचणी आदी गावांना यांनी भेटी देऊन कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाचा अटकाव करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवायच्या याबद्दल चर्चा करणेत आली. कोरोनाला पायबंद करण्यासाठी शासनाने यूद्ध पातळीवर प्रयत्न सूरू केले आहेत. या भेटी दरम्यान कॉन्टक्ट ट्रेसींग वाढवा.
लोकांना स्वॅब देण्यासाठी प्रवृत्त करा. बंद पाळा. दूखणे अंगावर न काढता योग्य वेळी उपचार करून घ्या. प्रशासनाला सहकार्य करा. अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांनी घरोघरी जावुन तपासणी करा.आशा वर्कर यांना कोणी आजारी आढळलेस त्यांनी ताबोडतोब वैद्यकीय अधिकारी नाअहवाल द्यावा जेणेकरून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार होणे शक्य होईल.अशा सक्त सूचना करण्यात आल्या.
तहसीलदार शितल मुळे भांबरे यांनी पूरपूर्व परिस्थितीचाही आढावा घेतला. पूररेषेत येणा-या घरवस्तींना आताच सूचना देवून त्यांचे स्थलांतर करा. अशा सूचना तलाठी व कोतवाल यांना केल्या. त्यांच्यासमवेत कसबा बीड बीडचे मंडल अधिकारी प्रवीण माने उपस्थित होते .यावेळी गावातील सरपंच, ग्रामसेवक, कोरोना दक्षता समिती, तंटामूक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, मदतनीस आशा वर्कर आदी उपस्थित होते.