दुचाकीसह एक मोबाइल हॅण्डरोट असा सुमारे ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी एलसीबीची कारवाई
प्रतिनिधी / इचलकरंजी
कामावरुन घरी जाणाऱ्या कामगारांना अडवून, त्यांना धक्काबुक्की करीत लूटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. गजानन रामचंद्र पटवेगार (वयं २१) मुदकाप्पा येलगुरप्पा मुलीमणी (वय २२, दोघे रा. जुना चंदूर रोड, बर्गे मळा, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून एक दुचाकी आणि एक मोबाईल हॅण्डसेट असा सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.