वार्ताहर/उञे
पन्हाळा तालुक्यात गेले दोन दिवस पाऊसाने उघडीप दिली आहे. यामुळे कासारी नदी पाणी पातळीत घट झाली असल्याने माजगाव पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे.
कासारी पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. उञे येथील गावचा पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. . यामुळे नदीकाठच्या उञे परिसरात पुराचे पाणी सखल भागात शिरल्याने नदीकाठी असणारे ऊस व इतर पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कमी असल्याने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाली आहे. नदी काठी पिके आठ दिवस पाण्यात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.