वार्ताहर / कुंभोज
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे नव्याने उभारण्यात येणारी ग्रामपंचायतीची इमारत भविष्याचा विचार करता कुंभोज ग्रामपंचायतची वाटचाल सध्या नगरपंचायतीकडे होणार असून, सदर जुन्या ठिकाणी ग्रामपंचायत इमारत उभी केल्यास ती जागा फारच कमी होणार आहे.
परिणामी शासनाने दिलेल्या निधीचा वापर करून कुंभोज एसटी स्टँडवरील आरोग्य पथकात सदर ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत सर्व सोयीनी युक्त बांधण्यात यावी, त्यामुळे कुंभोज नागरिकांना अनेक सेवा सुविधांचा लाभ होणार आहे. त्यासाठी आपण कोल्हापूर जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत कुंभोज माजी जिल्हा परिषद सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुणरावजी पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
कुंभोज ग्रामस्थ व कुंभोज ग्रामपंचायतीने शासनाला वारंवार वेगवेगळ्या कारणासाठी जवळ जवळ गावातील २२ एकर जमीन दिली असून शासनाने सदर जमिनीवर शाळा, दवाखाने अशा वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आहेत. परंतु आज कुंभोज ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी जागा आवश्यक असताना शासनाने आपल्या अतिरिक्त त्यात असणार्या काही जागा कुंभोजमध्ये शिल्लक असून. त्यापैकी एसटी स्टँड परिसरातील सरकारी दवाखान्यात कुंभोज ग्रामपंचायतीची सर्व सोयीयुक्त सुसज्ज इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व सदर ठिकाणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सरकारी कार्यालय एकत्रच आणावेत,अशी मागणी वारणा दूध संघाचे संचालक अरुणरावजी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
भविष्याचा विचार करता काही वर्षानंतर कुंभोज ग्रामपंचायतच्या नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार असून, त्यावेळी ग्रामपंचायतची सुसज्ज इमारत असणे गरजेचे आहे. सध्याच्या तीन गुंठे जागेमध्ये ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत उभी करणे अवघड असून नागरिकांना सर्व सोयीयुक्त सरकारी कार्यालय मिळणे अवघड आहे. परिणामी भविष्याचा विचार करून ग्रामपंचायतीची इमारत बांधकाम करण्यात यावे. ज्यामुळे कुंभोज नागरिकांना सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, परिणामी त्यासाठी इमारत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या अतिरिक्त असणाऱ्या राखीव जमिनीत बांधण्यात यावी व त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी. असे मत अरुण पाटील यांनी माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, कोल्हापूर जिल्हा शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांच्याशी बोलताना व्यक्त केले.
तसेच जुन्या तीन गुंठे जागेमध्ये ग्रामपंचायत इमारत उभी करण्यास आमचा विरोध असल्याचे मतही त्यांनी बोलताना व्यक्त केले. परिणामी या संदर्भात आपण लवकरच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांची भेट घेणार असून. कुंभोज गावचे आज पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला केलेल्या सहकार्याच्या मोबदल्यात जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी ग्रामपंचायत बांधकाम सहकार्य करावे असेही ते म्हणाले.