भाग भांडवलही 25 वरुन 30 हजारापर्यंत वाढवणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे पार पडली. चेअरमन लक्ष्मण उर्फ बाळ खेळेकर यांनी मागील आर्थिक वर्षात संस्थेस 4 कोटी 1 लाख इतका निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. सभासद कर्ज मर्यादा 35 लाख रुपये सभासद भागभांडवल 25 हजारहून 30 हजार करणे आदी महत्वपूर्ण ठराव करण्यात आला. तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी कोजिमाशि पतसंस्थेने मागील आर्थिक वर्षात राबविलेल्या अनेक सभासद हिताच्या योजनांची माहिती सांगितली.
यावेळी सभासद कर्जमर्यादा, भागभांडवल मर्यादा वाढविण्यात यावी, ज्युनियर कॉलेजच्या कर्मचाऱयांना सभासद करणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना सुरु करणे, सभासद महिलांसाठी कोजिमाशि सखी मंच सुरु करणे, 40 टक्के अनुदानावर आलेल्या शाळांच्या सभासदांना कर्जमर्यादा वाढवून देणे, कन्याजन्म ठेव पावती व कन्यादान साडी रक्कम वाढविण्यात यावी आदी मागण्या सभासदांकडून करण्यात आल्या. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन बाळ डेळेकर, व्हाईस चेअरमन सुभाष पाटील, तज्ञ संचालक दादा लाड, सीईओ अरविंद पाटील यांनी उत्तरे दिली. सुमारे 1400 हून अधिक सभासदांनी व्हीसीद्धारे या सभेत सहभाग घेतला.
मयत सभासदांचे 2.80 कोटींचे कर्जमाफ- तज्ञ संचालक दादा लाड
गत आर्थिक वर्षात मयत सभासदांचे तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये कर्जमाफी देण्यात आली आहे. अशी माहिती तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी दिली. कोरोनाची लागण झालेल्या 285 सभासदांना प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे 14 लाख 25 हजार रुपये मदत देण्यांत आली. 2019 च्या महापुरात पूररास्त झालेल्या 1117 सभासदांना प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे 11 लाख 17 हजार देण्यात आले आहेत. शिवाय पूररारत शाळांना प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे 30 शाळांना सुमारे 1 लाख 85 हजार रुपये इतकी रक्कम मदत स्वरुपात देण्यात आल्याचे त्यांनी संगितले.
सुधाकर डोणोलीकर ऋतुजा पाटील, राजश्री चौगुले, मनोहर पाटील दीपक पाटील, मदन निकम, मच्छिंद्र शिरगांवकर, जी. आर. पाटील, संजय व्हनागडे, सचिन कोंडेकर, तात्यासो गोते, प्रकाश कोकाटे, विजय कांबळे, निशिकांत चव्हाण, अमित राजमाने, प्रताप पाटील, एम. बी. पाटील, बी. के. मोरे, धनंजय धोत्रे, अशोक मानकर, दत्तात्रय जाधव, संजय ओमासे, संजय रोडे, सुनिल कल्याणी, जयसिंग पोवार, अकबर पन्हाळकर, गजानन काटकर, यशवंत पाटील अदींनी चर्चेत सहभाग घेतला. सुभाष पाटील यांनी आभार मानले.
संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा खेळीमेळीत कोजिमाशिची प्रत्येक वर्षीची वार्षिक सभा कोणत्या ना कोणत्या मुद्यावर वादग्रस्त ठरत असते. निवडणूक तोंडावर आल्याने यंदाची सभाही गाजण्याची चिन्हे दिसत होती. मात्र ही सभा अपवाद ठरली, संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा खेळीमेळीत आणि शांततेत पार पडली. |