इचलकरंजी येथील दोघा वृद्धांचा मृत्यू, बळींची संख्या १५ वर, पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ९९०
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी इचलकरंजी येथील महिला, पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. दोघेही वृद्ध आहेत. इचलकरंजीतील कोरोना बळींची संख्या ६ तर जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या १५ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात ६ पॉझिटिव्ह रूग्ण आल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्याही वाढत आहे.
जिल्हय़ात मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यत पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये गडहिंग्लज येथील ७५ वर्षीय महिला, इचलकरंजी येथील ४० वर्षीय पुरूष, ७३ वर्षीय वृद्ध, ७५ वर्षीय महिला, चंदगड येथील ३८ वर्षीय महिला, ५२ आणि ६२ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.