प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात गुरूवारी कोरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला तर 354 नवे रूग्ण समोर आले. जिल्हय़ात 157 जण कोरोनामुक्त झाले. आरटीपीसीआर लॅबमधील बिघाडामुळे सुमारे 3 हजार स्वॅबची खासगी हॉस्पिटल्समध्ये तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे उशिरा रिपोर्टमुळे रूग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरोनाने गुरूवारी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील कसबा बावडा येथील 53 वर्षीय पुरूषाचा खासगी हॉस्पिटल्समध्ये मृत्यू झाला. तर सीपीआर हॉस्पिटलमध्ये कागल तालुक्यातील मुरगुड येथील 55 वर्षीय पुरूष, करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील 33 वर्षीय पुरूष, भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील रूई येथील 53 वर्षीय पुरूष आणि चंदूर येथील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 235 झाली आहे.
जिल्हय़ात गुरूवारी 1 हजार 906 जणांची तपासणी केली. त्यातील 1 हजार 332 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 4 हजार 767 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 153 जणांना डिसचार्ज मिळाला. त्यामुळे कोरोनामुक्तांची आजपर्यतची संख्या 3 हजार 768 झाली आहे. आरटीपीसीआर लॅबमध्ये 581 स्वॅब तपासण्यात आले. त्यातील 507 निगेटिव्ह असून 69 पॉझिटिव्ह आहेत. अँटीजेन टेस्टचे 658 रिपोर्ट मिळाले. त्यातील 536 निगेटिव्ह असून 75 पॉझिटिव्ह आहेत. खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह रूग्ण धरून दिवसभरात 354 नवे रूग्ण समोर आल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
आजअखेर 3768 जण कोरोनामुक्त
गुरूवारी सायंकाळपर्यंत 581 प्राप्त अहवालापैकी 507 निगेटिव्ह तर 69 पॉझिटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंगचे 658 अहवालापैकी 536 निगेटिव्ह तर 75 पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमधील 210 पॉझिटिव्ह तर 32 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरला पाठवले असून एकूण 354 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आजअखेर 8770 पॉझिटिव्हपैकी 3768 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर जिह्यात 4767 प्नाझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
दिवसभरातील 354 पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरा 3, चंदगड 3, गडहिंग्लज 2, गगनबावडा 1, हातकणंगले 16, कागल 5, करवीर 46, पन्हाळा 1, राधानगरी 1, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्र 100, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 152 व इतर 23 रूग्णांचा समावेश आहे. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 189, भुदरगड 244, चंदगड 405 गडहिंग्लज 276, गगनबावडा 29, हातकणंगले 794, कागल 158, करवीर 949, पन्हाळा 332, राधानगरी 297, शाहूवाडी 324, शिरोळ 343, नगर पालिका क्षेत्र 1797, महापालिका क्षेत्र 2495 असे 8632 आणि इतर 138 असे 8770 रुग्णांची आजअखेर जिह्यात संख्या आहे. 8770 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 3768 जणांना डिस्चार्ज मिळाला. 235 जणांचा मृत्यू झाल्यामुळे उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 4767 इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसभरात खासगी लॅबच्या रिपोर्टची संख्या अधिक
येथील आरटीपीसीआर लॅबमध्ये बिघाड झाल्यामुळे गुरूवारी खासगी लॅबकडून स्वॅब रिपोर्ट आले. यामध्ये आजरा केअर सेंटर ऍटीजेन टेस्टमधील 3, आयसोलेशन हॉस्पिटल ऍटीजेन टेस्टमधील 43, आयजीएम ऍटीजेन टेस्टचे 25, हुपरी अँटीजेन टेस्टतील 4, शहरातील कृष्णा लॅबमधील 200, डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील 69 पॉझिटिव्ह रिपोर्टचा समावेश आहे. त्यामुळे सायंकाळपर्यत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 354 झाली तर एकूण रूग्णसंख्या 8770 झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह ः 8770
कोरोना मुक्त रूग्ण ः 3768
उपचार घेणारे रूग्ण ः 4767
एकूण बळी ः 235