स्वॅब टेस्टिंगनंतरही सिटी स्कॅन, एक्सरेचा सल्ला, सामान्य रूग्णांची स्कॅन, एक्सरेसाठी लॅबमध्ये गर्दी, केंद्राच्या टेस्टिंग गाईडलाईन्सकडे सोयीस्कर दुर्लक्ष
कृष्णात पूरेकर / कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 30 हजारांच्या उंबरठय़ावर आहे, कोरोना मृत्यूची टक्केवारी 3 टक्क्यांवर गेली आहे. पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारीही 20 टक्क्यांवर आहे. त्यातून कोरोनाच्या धास्तीने सामान्य रूग्ण कोरोना टेस्ट करत आहेत. यासोबतच सिटी स्कॅन, एक्सरेचा सल्ला दिला जात आहे. या टेस्टिंगद्वारे लॅबकडून रूग्णांची लुट सुरू आहे. केंद्राच्या गाईडलाईन्सनुसार 4 हजारांत सर्व टेस्ट असताना रूग्णांकडून दुप्पट आकारणी होऊ लागल्याने जिल्हा प्रशासन यावर काय भुमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोना रूग्णांना बेड, उपचार, तपासणी आदीसाठी केंद्र शासनाने काही निकष दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात दराची नियमावली जाहीर केली आहे. यापेक्षा रूग्णांकडून अधिक आकारणी करणाऱया हॉस्पिटलवर कारवाई केली जात आहे. प्रसंगी लेखापरीक्षकांच्ग्नया तपासणीतून अव्वाच्या सव्वा बिले कमी करण्यात आल्याची उदाहरणेही आहेत. जिल्हा प्रशासन कोरोना रूग्णांसाठी आवश्यक सुविधा देत आहेत. जीवनदायी योजनेंतर्गत हॉस्पिटलमध्ये 80 टक्के बेड कोरोना रूग्णांसाठी वापरले जात आहेत. खासगी हॉस्पिटल्सही ताब्यात घेतली आहेत. संस्थात्मक, गृह अलगीकरण केले जात आहे.
कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येने नागरिकांत धास्ती वाढली आहे, भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे सामान्य रूग्णही कोरोटाईनच्या भीतीने घरीच उपचार घेत आहेत. यातील को आर्बीड रूग्ण, अशक्त असलेल्यांना श्वसनाचा त्रास वाढल्याने काही डॉक्टरांनी अशा रूग्णांना सिटीस्कॅन, एक्सरेची सुचना केली आहे. कोरोना टेंस्ट रिपोर्ट येण्यापुर्वीच अशा चाचण्या करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे लॅबमध्ये आता कोरोना रिपोर्टसह सिटीस्कॅन, एक्सरे रिपोर्टसाठी गर्दी वाढत आहे.
शासनाने कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आकारलेल्या दरपत्रकात चार हजारांत कोरोना टेस्ट, त्यातच सिटी स्कॅन, एक्सरेचा समावेश केला आहे. बेडसाठी 4 हजार रूपयांपासून पुढे दर्जानुसार दर आकारले आहेत. कोरोना टेस्टमध्ये सिटीस्कॅन, एक्सरे खर्चाचा समावेश आहे. पण त्यानुसार काही लॅबकडून आकारणी होत नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे सर्दी, ताप, खोकल्याच्या सामान्य रूग्णांना छातीत कफ असल्याचे सांगत सिटी स्कॅन, एक्सरे काढण्यास सुचवले जात आहे. या सिटीस्कॅन, एक्सरेसाठी पाच हजारांपर्यत बिल आकारले जात आहे. हे बिल पाहता केंद्राने कोरोना तपासणीसाठी घालून दिलेल्या गाईडलाईन्सकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. सिटीस्कॅन, एक्सरेंसाठी कोरोनाच्या नावाखाली रूग्णांची लुट करणार्या लॅबवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासन कोणती भूमिका याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सर्दी, खोकला, ताप असेल तर कोरोनाची अँटीजेन टेस्ट, स्वॅब टेस्ट केली जात आहे. ऍटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरही छातीचा सिटीस्कॅन, एक्सरे काढण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी रूग्णांकडून पाच हजारांपर्यत बिल घेतले जात आहे. भीतीपोटी या टेस्ट सामान्य रूग्णांकडून केल्या जात असल्या तरी काही लॅबकडून अशा टेस्टींगद्वारे लुट सुरू असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होंत आहेत.