गगनबावडा प्रशासनाची डोकेदुखी
प्रतिनिधी/गगनबावडा
कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा जिवाची बाजी लावून रात्रंदिन कार्यरत आहे. पोलिस, आरोग्य व महसूल या विभागाचे विशेष योगदान आहे. गगनबावडा तालुक्यात याच विभागातील बाराजणांचा अहवाल आज अखेर पॉजिटीव्ह आला आहे. कोरोना यौध्देच पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
गगनबावडा तालुक्यात एक पोलिस,एक वनपाल,एक मंडलाधिकारी,एक आरोग्य सेविका,आशा वर्कर्स व अन्य अशा सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल रात्री उशिरा गगनबावडा येथील गावकामगार तलाठी कोरोनाबाधित आढळला आहे. कोरोनापासून बचाव कसा करावा, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी जनजागृती करणारेच कोरोनाबाधित निघाल्याने तालुक्यात प्रशासनाची चिंता वाढली आहे.
तालुक्यात आजअखेर २९ जण कोरोणाबाधित आढळले आहेत.त्यापैकी एक मयत, यशस्वी उपचार करून दहाजण घरी परतले. तर गगनबावडा कोव्हिड सेंटर मध्ये सद्या अठरा जण उपचार घेत आहेत.