प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 471 नवे रूग्ण आढळले तर 701 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 4 हजार 31 आहे. कोरोना मृत्यूत वाढ झाली असून नव्या रूग्णांत घट झाली आहे. दिवसभरात 10 हजारांनी टेस्ट कमी झाल्या. कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 2 लाखांवर तर कोरोना मृत्यूचा आकडा 6 हजारांवर पोहोचला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत कोरोना बळींची संख्या 6 हजार 3 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 994, नगरपालिका क्षेत्रात 804, शहरात 1 हजार 217 तर अन्य 588 आहेत. दिवसभरात 701 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 90 हजार 723 झाली आहे. गेल्या 24 तासांत 471 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 3, भुदरगड 1, चंदगड 2, गडहिंग्लज 13, गगनबावडा 0, हातकणंगले 107, कागल 28, करवीर 66, पन्हाळा 16, राधानगरी 1, शाहूवाडी 17, शिरोळ 76, नगरपालिका क्षेत्रात 56, कोल्हापुरात 69, तर अन्य 16 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 357 झाली आहे.
रत्नागिरीतील एकाचा तर कोल्हापूर शहरात चौघांचा कोरोनाने मृत्यू
कोल्हापूर शहरात शुक्रवारी 69 नवे रूग्ण दिसून आले तर चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शाहूपुरी सासने ग्राऊंड येथील विवाहिता, शिवम हौसिंग सोसायटी, रमणमळा येथील महिला अन् शहापुरे गल्ली, कदमवाडी येथील वृद्धेचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला.
कोरोना रूग्ण : 471 ,एकूण : 2,00,357 कोरोनामुक्त : 701, एकूण : 1,90,723 कोरोना मृत्यू : 12, एकूण मृत्यू : 5603 सक्रीय रूग्ण : 4031